पुणे : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने दडपणाखाली असतात. या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बोर्डातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ व दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या आहेत.
भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न याबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, असे राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक
१) ९०११३०२९९७, २) ८२६३८७६८९६, ३) ८७६७७५३०६९, ४) ७३८७४००९७०, ५) ९९६०६४४४११, ६) ७२०८७७५११५
७) ८१६९२०२२१४, ८) ९८३४०८४५९३, ९) ८३२९२३००२२, १०) ९५५२९८२११५