पुणे : फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेच्या सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेकडे १५ डिसेंबर अखेर व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यास १५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.
पात्र विद्यार्थी गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्यमंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जारी केल्या आहेत.