पुणे – शिक्षण विभागात सव्वापाच हजार अस्थायी पदांना मुदतवाढ

पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयातील 5 हजार 279 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अस्थायी पदांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेशही शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

राज्यात पुणे जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या जिल्ह्यात शिक्षण विभागाची विविध कार्यालये उभारण्यात आलेली आहेत. या कार्यालयांसाठी 7 हजार 131 पदे निश्‍चित करण्यात आली आहेत. यातील 1 हजार 852 पदे ही स्थायी आहेत. उर्वरित पदे ही अस्थायी आहेत. यात शिक्षण आयुक्‍त कार्यालयात स्थायी पदे 234 तर अस्थायी पदे 406 आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासांठी एकूण 6 हजार 284 पदे मंजूर आहेत. यातील 1 हजार 537 पदे ही स्थायी व 4 हजार 747 पदे ही अस्थायी आहेत.

लेखाशीर्षाखालील मंजूर तरतूदीतून खर्च होणारी एकूण पदे 6 हजार 924 आहेत. यात स्थायी पदे 1 हजार 771 तर अस्थायी पदे 5 हजार 153 एवढी आहेत. लेखाशीर्षाखालील मंजूर तरतुदीतून खर्च न होणारी एकूण पदे 207 आहेत. यातील 81 पदे ही स्थायी व 126 पदे ही अस्थायी स्वरुपाची आहेत.

या विविध कार्यालायातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुदत संपली होती. त्यामुळे या सर्वच पदांना 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव सं.द.माने यांनी काढले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.