पुणे : लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वेंना मुदतवाढ

पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी आणि येत्या काळातील उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वेंना मुदतवाढ दिली आहे. यामध्ये मुंबई-हटीया, पुणे-संतरागाछी आणि साईनगर शिर्डी- हावडा या मार्गांवर धावणाऱ्या विशेष रेल्वेचा समावेश आहे. तर ब्लॉकमुळे पुणे ते सोलापूर मार्गावरील रेल्वे 2 ऑक्‍टोबरपर्यंत रद्द करण्यात येणार आहे.

पुणे-संतरागाछी ही साप्ताहिक विशेष रेल्वे 4 ऑक्‍टोबर ते 27 डिसेंबर आणि संतरागाछी-पुणे ही साप्ताहिक विशेष रेल्वे 2 ऑक्‍टोबर ते 25 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. तर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया ही द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे 3 ऑक्‍टोबर ते 2 जानेवारीदरम्यान, हटिया ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही द्वि साप्ताहिक विशेष रेल्वे 1 ऑक्‍टोबर ते 31 डिसेंबरदरम्यान, साईनगर शिर्डी-हावडा साप्ताहिक विशेष रेल्वे 9 ऑक्‍टोबर ते 1 जानेवारीदरम्यान, हावडा-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष एक्‍स्प्रेस 7 ऑक्‍टोबर ते 30 डिसेंबरदरम्यान धावणार आहे.

यासह 29 सप्टेंबरपासून पुणे-एर्नाकुलम एक्‍स्प्रेस दर रविवारी आणि बुधवारी धावणार आहे. तर, 1 ऑक्‍टोबरपासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी एर्नाकुलम-पुणे एक्‍स्प्रेस धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, सोलापूर विभागातील दौंड-कुर्डूवाडी विभागात ट्रॅक डबलिंगच्या कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे-सोलापूर-पुणे ही रेल्वे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबरदरम्यान रद्द केली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.