पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी आलेल्या निधीचा अपहार

कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; पाच जणांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : कोरोना काळात देहविक्री करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी पाठविलेला निधी दुसऱ्या महिलांच्या बॅंक खात्यावर जमा करून 7 ते 8 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बॅंक खात्याचा संबंधीत पदाधिकाऱ्यांनी गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

याप्रकरणी नायब तहसीलदार प्रकाश सिद्धेश्‍वर व्हटकर (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. गौरी तेजबहादूर गुरूंग (वय 32, रा.धनकवडी), सविता अशोक लष्करे (वय 26 ), सारिका अशोक लष्करे (वय 30, दोघीही रा. येरवडा, अमोल दत्तात्रय माळी (वय 25, रा. बालाजीनगर), महेश राजु घडशींग (वय 26, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबरोबरच कायाकल्प संस्थेचे इतर सभासद व सोनवणे यांच्याविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते 26 एप्रिल 2021 दरम्यान पर्वती येथील लक्ष्मीनगर परिसरात घडला. 52 हून अधिक महिलांच्या बॅंक खात्यावर पैसे घेण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.