पुणे – अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया; दि.21 मे रोजी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे – इयत्ता अकरावीच्या सन 2019-20 या वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत येत्या दि.21 मे रोजी अधिकाऱ्यांना विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेची नियमावली, मुख्याध्यापक व झोन समितीची जबाबदारी, प्रवेश अर्ज भाग-1 व भाग-2 चे ऍप्रूव्हल कसे करणे याचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना देणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व झोनप्रमुख, झोन सहाय्यक, पर्यवेक्षिय अधिकारी, झोननिहाय संपर्क प्रमुख, तंत्रसहायक, मुख्याध्यापक आदींचा प्रशिक्षणात समावेश केला जाणार आहे.

पुणे शहर, कर्वेनगर ,कोथरुड, पर्वती, धनकवडी, स्वागगेट, सिंहगड, कॅम्प, येरवडा या विभागासाठी सकाळी 12 ते 2 यावेळेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील असेंब्ली हॉलमध्ये तर हडपसर, शिवाजीनगर, औंध, पाषाण, पिंपरी, भोसरी, चिंचवड, निगडी या विभागासाठी 3 ते 5 यावेळेत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी वेळेवर उपस्थित राहवे, अशा सूचना इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.