पुणे – वीजबिल भरणा केंद्र रविवारी सुरू राहणार

पुणे – थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व वीजबिल भरणा केंद्र येत्या रविवारी (दि. 31) सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.

पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी रविवारी सार्वजनिक सुटी असली तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरण मोबाईल ऍपद्वारे “ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)