पुणे – निवडणूक काळात आतापर्यंत सव्वा कोटींची दारू जप्त

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदार संघांच्या कार्यक्षेत्रातून तब्बल 1 कोटी 26 लाख रूपयांचा मद्यासाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 हजार लिटर, तर शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून 96 हजार लिटर मद्यासाठा जप्त केला आहे.

निवडणूक आचारसंहितेचे योग्य पालन होत आहे किंवा कसे याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नेमली आहेत. तसेच सी-व्हिजिल ऍपवर आलेल्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 315 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बेकायदा मद्य बाळगल्याचे गुन्हे सर्वाधिक आहेत. विनापरवाना सभा घेतल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वाधिक गुन्हे अवैधरित्या मद्य विक्री केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा प्रशासन, शहर आणि ग्रामीण पोलिस यांच्याकडून तसेच भरारी पथकांकडूनही अवैध मद्यासाठ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.