पुणे – डी.एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या कंपन्यात तब्ब्ल 32 हजारांहून अधिक ठेविदारांची तब्बल १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ठेविदार ही रक्कम परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही ठेविदारांचा तर मृत्यू झाला आहे. मात्र, पैसे मिळालेले नाहीत. हे पैसे मिळविण्यासाठी राजकीय पक्षांकडून मदत होत नाही.
असंवेदशीलपणा दाखविण्यात येत आहे. त्यामुळे ठेविदार नाराज असून, विधानसभा निवडणुकीबाबत आक्रमकपणे निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहेत. डीएसके ठेविदार संघटना, हिंदू महासंघाच्या मदतीने अनेक महिने आंदोलनात असून पुढील २ ते ३ दिवसांत मेळावा घेऊन ते निर्णय घेणार असल्याचे हिंदू महासंघचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकात म्हटले आहे.
डीएसके प्रकरणी सर्व सरकारी यंत्रणा पूर्ण असंवेदनशील आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेतृत्वाने याबाबत सहकार्य दाखवली नसल्याने हिंदू महासंघाच्या सहकार्याने सर्व ठेविदार पहिल्यांदाच राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता उलट ती डावलून सर्व ठेविदारांची फसवणूक करण्यात आली आहे, याकडे ठेविदारांनी लक्ष वेधले आहे. दि. 10 नोव्हेंबरला चित्तरंजन वाटीकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत सर्व ठेवीदार आणि हिंदू महासंघकडून आनंद दवे, सूर्यकांत कुंभार, मनोज तारे, नितीन शुक्ल आणि आदिती जोशी उपस्थित होते. ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी दीपक फडणवीस, शरद नातू, सुधीर गोसावी, नितीन मोरे आदी उपस्थित होते.