पुणे – बाणेर कोविड रुग्णालयातील डॉक्टर आणि सुरक्षारक्षकाला पोलिसाने मारहाण केली. या आरोपावरून पोलीस नाईक सचिन गायकवाड याला मंगळवारी खात्यातून निलंबित करण्यात आले.
कोविड सेंटरमध्ये जीवाचा धोका पत्करून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना मारहाण केल्याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली. गायकवाड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-3 मध्ये कार्यरत होता. डॉ. अजयश्री मस्कर यांना दोन दिवसांपूर्वी गायकवाड व त्याच्या भावाने धक्काबुक्की केली.
त्याबाबत ते रुग्णालयीन सहकारी आणि महापालिकेच्या सुरक्षा रक्षकासमवेत बाणेर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. तेथे गायकवाड बंधूनी त्यांना मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करणारे सुरक्षा अधिकारी अजित गजमल यांनाही त्यांनी मारहाण केली.
गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्याची खातेनिहाय चौकशी देण्यात आले होते. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गायकवाड यांनी याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला.