पुणे – अर्हम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कार २०२४ सोहळा दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी एस्.एम्. जोशी सभागृह पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार श्री.ओमप्रकाश (बच्चू) कडू लाभले. तसेच सरहद्द फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय नहार, आज का आनंद वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद अग्रवाल, श्री महावीर महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. युवराज शहा हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पॅरिस येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात एफ४६ या दिव्यांग श्रेणीत रजत पदक मिळवलेल्या सचिन खिलारे यांचा अर्हम फाऊंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पारितोषिक विजेते विनम्र खटावकर( बौद्धिक अक्षमता), विष्णू चिद्रेवार (बहु विकलांग), रोहन सोनवणे(बहु विकलांग), रोहित भारगुणे( अंध ), प्रियंका दाभाडे( कर्णबधिर), हरिदास शिंदे ( शारीरिक दिव्यांग), या विविध प्रकारातील खेळाडूंना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना श्रीफळ, स्मृतिचिन्ह,भेटवस्तू आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.डॉक्टर शैलेश पगारिया सर यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या भाषणामध्ये संस्थेबद्दल माहिती दिली. आणि फाउंडेशन दिव्यांगांसाठी कसे कार्य करते याबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री ओम प्रकाश कडू यांनी अर्हम फाउंडेशन ला शुभेच्छा दिल्या व आपल्या भाषणामध्ये त्यांनी असे म्हटले की जे राजकारण करतो आणि सध्या जे जातिव्यवस्थेला धरून राजकारण सुरू आहे. ते न करता समाजातील दिव्यांगा सारख्या दुर्लक्षित घटकाकडे लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. आणि त्यांनी संस्थेला आश्वासन दिले आहे की भविष्यात कोणतीही गरज लागेल त्यासाठी ते स्वतः मदत करण्यास तयार आहेत .
सरहद फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय नहार सर यांनी सांगितले की आपण सर्वांनी मानवतेसाठी काम केले पाहिजे. तसेच त्यांनी अर्हम् फाउंडेशनचे जे कार्य चालू आहे त्याचे कौतुकही केले. आणि भविष्यात आपणही अर्हम् फाउंडेशनच्या सोबत काम करू इच्छित आहे अशी इच्छा व्यक्त केली . आणि संस्थेला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आज का आनंद या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक श्री आनंद अग्रवाल यांनी दिव्यांगांसाठी कार्य करणे किती महत्त्वाचे आहे आणि समाजासाठी किती गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले आणि संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री महावीर महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री युवराज शहा यांनी मानवता आणि समाजातील सर्व दुर्लक्षित स्तरावरील स्तरावरील समाजासाठी कसे कार्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, संचालक डॉ. अतिश चोरडिया, खजिनदार श्री. श्रीकांत पगारिया व विश्वस्त श्री. स्वराज पगारिया यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विविध शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे मॅडम यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शन श्री. स्वराज पगारिया यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. श्रद्धा कुलकर्णी मॅडम आणि प्रज्ञा
देशपांडे मॅडम यांच्यासोबत वाबीज मॅडम, प्रियांका, अनिता, आदिती, गौरी मॅडम आणि शुभम सर या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.