करोनाच्या दडपणातून काहीसा दिलासा

पुणे विभागात करोनामुक्‍तीच्या संख्येत झपाट्याने वाढ

  • 4 लाख 83 हजार 253 पैकी 4 लाख 30 हजार 556 बाधित बरे

पुणे – पुणे विभागात करोनामुक्‍त होणाऱ्यांच्या संख्येने झपाट्याने वाढत होत आहे. एकीकडे एकूण बाधित संख्येने 4 लाख 83 हजार 253 चा आकडा पार केला असला तरी त्यातील 4 लाख 30 हजार 556 बाधित बरे झाले आहेत.

मागील आठ दिवसांत करोनामुक्‍त होणाऱ्यांचे प्रमाण 85 टक्‍के होते. तर आज त्यामध्ये साडेचार टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 89.10 टक्‍के एवढे प्रमाण आहे.

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातीपासून बाधित संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यातच बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या दहा दिवसांत “बाधित कमी आणि करोनामुक्त अधिक’ असे चित्र आहे. विशेषत: पुणे शहरात बाधित सापडण्याचा वेग खाली आला आहे.

सप्टेंबर महिन्यात विभागामध्ये करोनामुक्‍तीचे प्रमाण 77 ते 78 टक्‍के इतके होते. तर आज हे प्रमाण जवळपास 90 टक्‍क्‍यांपर्यंत आले आहे. सक्रिय बाधितांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ही संख्या 56 हजार 199 इतकी होती. आज त्यामध्ये तब्बल 43 हजाराने कमी झाली आहे. आतापर्यंत 13 हजार 143 बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.