पुणे -“बैलपोळा’ हा सण आमच्यासाठी दिवाळीसारखाच असतो. ज्या अन्नदात्याच्या कष्टावर आपण शेती करतो त्याचे दररोज पूजन करावे. आजही आम्ही दररोज सकाळी गोठ्यात गेल्यावर बैलांना नमस्कार करून शेतात जातो, असे प्रगतशील शेतकरी नथू इंगळे आणि गाडामालक चैतन्य इंगळे यांनी सांगितले.
गाडा शर्यतीमध्ये विजयाची सलामी देणाऱ्या सरपंच आणि पिंट्या या दोन्ही बैलांचे नाव भूगावमध्ये प्रसिद्ध आहे. आज सकाळी गाडामालक चैतन्य यांनी कुटुंबाने बैलांना विविध रंगानी सजविण्यात आले.
त्यांची कोरीव शिंगांना झालर, गोंडे लावण्यात आले होते. त्यानंतर घरच्या लक्ष्मीच्या हस्ते त्यांची पुजा करून पुरण-पोळीचा घास भरविण्यात आला. यावेळी मंगेश, शैलेश आणि ओंकार इंगळे उपस्थित होते.