शिक्रापूर : लोक आपल्यापासून बाजूला का गेले. करंदीला काय कमी केले. दोनशे मतांनी निवडून आल्यावर कोणत्या तोंडाने मंत्रिपद मागणार, असे वक्तव्य करीत विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या कमी मताधिक्याबाबत माजी सहकार मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पुन्हा नाराजीचा सूर आळवला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वळसे पाटील यांनी अनेक जाहीर कार्यक्रमातून नाराजीचा सूर आळवून मनातील खंत व्यक्त केली आहे.
करंदी (ता. शिरुर) येथे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी वळसे पाटील हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सविता पऱ्हाड, प्रदीप वळसे पाटील, दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, सुभाष उमाप, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमोल जगताप, सरपंच शारदा ढोकले, उपसरपंच नितीन ढोकले, सोसायटीचे चेअरमन पोपट नप्ते, व्हाईस चेअरमन मोहन ढोकले, क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष विकास दरेकर, राघू नप्ते उपस्थित होते.
ते म्हणाले की, वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत लोक आपल्यापासून बाजूला का गेले, करंदीला काय कमी केले. दोनशे मतांनी निवडून आल्यावर कोणत्या तोंडाने मंत्रिपद मागणार, असे सांगत मंत्रीपद असल्यावर हातात ताकद असते. नाही ते काम करण्याची हिंमत असते, असे देखील वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, करंदी गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
करंदी गटात कोल्हे, निकमच सरस
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गावातील काही पदाधिकारी शरद पवार गटात तर काही पदाधिकारी अजित पवार गटात विभागले गेले. त्यांनतर होणाऱ्या निवडणुकामध्ये करंदी गावासह जिल्हा परिषद गटातून यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये आढळराव पाटील यांना देखील कमी मताधिक्य डॉ. अमोल कोल्हे यांना ४०० मतांची आघाडी मिळाली. त्यांनतर स्वतः दिलीप वळसे पाटील यांना देखील कमी मताधिक्य मिळत विरोधी उमेदवार देवदत्त निकम यांना करंदी गावातून २०५ चे तर करंदी जिल्हा परिषद गटातून १७८० ची आघाडी मिळालेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जनमताचा कौल हा विधानसभा निवडणुकीतही कायम राहिला आहे.