सासवड – सासवड (ता.पुरंदर) येथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह माऊली नामाचा जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात सासवडनगरीत रात्री 9.30 सुमारास दाखल झाला उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला.
सासवड नगरीत माऊलींच्या पालखी रथावर नगरपालिकेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. माऊलींचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सासवडनगरीत दुतर्फा गर्दी होती. माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटक्यांच्या आतिश बाजी करत माउली….माउलींचा जयघोषाने रंगला माउलीचा सासवड नगरीत 2 व 3 रोजी असा दोन दिवसांचा मुक्काम आहे.
नगरीत माऊलींच्या पालखीचे आगमन रात्री 9.30 वाजता झाल्यावर चंदन टेकडी येथे नगरपरिषदेच्या वतीने व आमदार संजय जगताप, माजी नगरसेवक, नगरसेविका व नगरपालिका विभाग प्रमुखांनी सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी, चोपदार यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन माऊलींच्या पालखी रथाचे स्वागत केले. त्यानंतर समाज आरती झाली. भाविकांनी दर्शनासाठी रात्री उशीरा पर्यंत दर्शनाचा लाभ घेतला.
सासवड (ता.पुरंदर) : येथे माऊलींच्या पालखी रथाचे सासवड नगरीत आगमना वेळी.