इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान काही गावातील अपवाद वगळता रात्री उशिरापर्यंत शांततेत पार पडले. दुपारपर्यंत बऱ्याच मतदान केंद्रांवर अशी गर्दी झाली होती. सायंकाळी चार वाजण्याच्या नंतर अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
तालुक्यातील 337 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. पाच वाजेपर्यंत 64.50 टक्के मतदान झाले होते दरम्यान मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतरची म्हणजेच सहा वाजेपर्यंत ची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळू शकले नाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.दरम्यान तालुक्यातील लाखेवाडी,शिरसटवाडी या गावात वादावादी झाली.
इंदापूर विधानसभेसाठी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर मिळून सकाळी सात ते नऊ या वेळेत ५.५ टक्के मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत १६.२०% मतदान झाले. एक वाजेपर्यंत २९.५०% मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ .५०टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता ६४.५० टक्के मतदान झाले होते.