राजवर्धन पाटील ः लुमेवाडीत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा दर्ग्याला भेट
इंदापूर – माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील व आमच्या कुटुंबीयांचे लुमेवाडी गावावर अखंड प्रेम राहिले आहे. कायम सुखदुःखात आम्ही लुमेवाडीकरांच्या असतो. जातीयवाद पसरवणार्या विरोधकांना या गावातील मतदार जागा दाखवतील. तालुक्यात सर्वाधिक मतदानाचे लीड हर्षवर्धन पाटील यांना मिळेल, असा आशावाद नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
लुमेवाडी (ता. इंदापूर) येथे इंदापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ, येथील प्रसिद्ध दर्गा हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांच्या दर्ग्याला भेट सोमवारी (दि. 11) राजवर्धन पाटील यांनी दिली. येथील समस्त लुमेवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गावातून रॅली काढून, राजवर्धन पाटील यांचे स्वागत केले.
राजवर्धन पाटील यांनी गाजी – ए – मिल्लत सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या मजारवर चादर चढवून दर्शन घेतले. यावेळी शाहिरअल्ली शेख, रमजान जमादार, गोंदीचे सरपंच रणजीत वाघमोडे, मुसा पठाण, सदाम जमादार, अमिन शेख, मोईन शेख, मुनिर अत्तार यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजवर्धन पाटील म्हणाले, लुमेवाडी गावात आम्ही आल्यानंतर पहिल्यांदाच कमालभाई नाहीत.त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू आहेत. त्यांना आमचे सर्व कुटुंबीय माझ्यासह भेटले. कमाल भाई ठणठणीत व्हावेत, यासाठी देवाला आशीर्वाद मागत आहोत.अशी माहिती राजवर्धन पाटील यांनी दिली.
एकही मत दुसरीकडे जाऊ देऊ नका
मुस्लिम बांधवांना त्रास देण्याची भूमिका राज्यभर देशभर भारतीय जनता पार्टी व यांचे मित्रपक्ष देत आहेत. देशाचे संविधान धोक्यात आहे. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे ताजीवादीना धडा शिकवा, असे आवाहन राजवर्धन पाटील.