बाबाजी काळे : येलवाडीकरांनी मिरवणूक काढून केले स्वागत महाळुंगे इंगळे, दि. 9 (वार्ताहर) – राज्यात महाविकस आघाडीचे सरकार येणार असल्याने सत्तेतील प्रतिनिधी म्हणून मला तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार (ठाकरे गट) बाबाजी काळे यांनी केले.
येलवाडी ग्रामस्थांनी बाबाजी काळे यांचे वाजत गाजत स्वागत करत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. हा मिळत असलेला प्रतिसाद पाहून निवडणुकीच्या निकालाची तारीखच असल्याची थोड्या वेळासाठी जाणीव झाल्याचे मत काळे यांनी केले. दरम्यान, काळे यांनी कान्हेवाडी, सांगूर्डी, येलवाडी परिसरातून गावभेट दौरा सुरू झाला आणि रासे, भोसे गावच्या परिसरात बाबाजी काळे यांच्या प्रचार दौर्याची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, अशोक खांडेभराड, हिरामण सातकर, रामदास धनवटे, माणिक गोरे, शेखर घोगरे, महेंद्र गोरे, देवेंद्र बुट्टे पाटील, उपसभापती क्रांती सोमवंशी, विजया शिंदे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून भारावून गेलो असल्याच्या भावना बाबाजी काळे यांनी व्यक्त केल्या व त्यामुळेच खेड-आळंदीत महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे शिवसेना खेड-तालुका निवडणूक समन्वयक अमोल पवार यांनी नमूद केले.
टाळ्या व शिट्ट्या वाजवत प्रतिसाद
रेटवडी येथे श्री चारुंबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने बैलगाडा घाटात बाबाजी काळे यांनी उपस्थिती लावताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवत प्रतिसाद दिला दरम्यान काळे यांनी बैलगाडा घाटात उतरून उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केले यावेळी देखील उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत प्रतिसाद दिला.