रोहित पवार यांची मिश्किल टिप्पणी
बारामती – युगेंद्र पवार व माजी तालीम एक आहे. वस्ताद पण एक आहेत. आखाडे मात्र दोन आहेत. अशी मिश्किल टिप्पणी आमदार रोहित पवार यांनी केली.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार यांनी बारामती तालुक्यात प्रचार दौरा केला. प्रचारदरम्यान ते बोलत होते. यावेळी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
युगेंद्र पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार होताना दिसत आहे.
शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी पाच सभा घेतल्या. रोहित पवार यांनी देखील जिरायती पट्ट्याचा दौरा केला. यावेळी युगेंद्र पवार यांचे वडील व अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला पवार या प्रचारात सक्रिय आहेत.
यावेळी प्रचारादरम्यान रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर देखील टीका केली. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही लढाई होत आहे.