इंदापूर : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर (एआय) हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळणार आहे.अशा तंत्रज्ञानाची माहिती शरद कृषी महोत्सवासारख्या प्रदर्शनातून मिळत आहे. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल,असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बारामती अॅग्रोचे व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे यांनी केले.
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारपासून शरद कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी गुळवे बोलत होते. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, ‘राष्ट्रवादी’चे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, किसन जावळे, अनिकेत निंबाळकर, अॅड. इनायत काझी, रेशमा शेख, अस्मा मुलाणी, तमन्ना शेख, रूपाली रणदिवे, देविदास भोंग, अमोल मुळे, संजय शिंदे, समद सय्यद, राजाराम सागर, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, मयूर शिंदे, अक्षय कोकाटे आदी उपस्थित होते.
सोमवारपर्यंत (दि. १७) चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीतील ‘एआय’ या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत चचार्सत्रासह विविधउपक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती अवजारे, बी बियाणे, कीटकनाशके, हरितगृह व इतर साहित्य, कृषी जैविक तंत्रज्ञान, मासेमारी, डेअरी तंत्रज्ञान, कुक्कुटपालन तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया उद्योग, अपारंपरिक ऊर्जा, कृषी बाजार, ठिबक सिंचन, शेळी मेंढी पालन माहिती, सौर ऊर्जा माहिती, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस यांच्यासह खाऊ गल्ली, बचत गटांच्या पदार्थांचे स्टॉल, असे एकूण २००हून अधिक स्टॉल आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.अमोल भिसे यांनी आभार मानले.
इंदापूर : शरद कृषी महोत्सवास प्रारंभ करताना मान्यवर.