बेल्हे-जेजुरी महामार्गावर मंगरुळ येथील घटना
बेल्हे – मालवाहतूक आयशर टेम्पो, दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.21) सकाळी सव्वासातच्या सुमारात बेल्हे-जेजुरी महामार्गावर मंगरुळ येथील कुकडी नदीच्या वळणावर घडली. दरम्यना, याप्रकरणी टेम्पो चालकाला आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
रत्नाकर श्रीमंत गायकवाड (वय 36, रा. कोंढवा पुणे), आरती राजू माने (वय 38, रा. जुनी सांगवी, पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर भारत शिरतार (रा.सिन्नर, जि. नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. तर शुभम शिवदास दुधाळ यांनी फिर्याद दिली आहे.
पुण्यावरून शिर्डी येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून (एमएच 12 एसएस 9296) युवक-युवती निघाले होते. मंगरूळ (ता.जुन्नर) येथील कुकडी नदीच्या वळणावर जात असताना समोरून येणार्या मालवाहतूक आयशर टेम्पो (एमएच 15 डीके 5088) ने तरुण तरुणीला चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. शुभम शिवदास दुधाळ यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.