भिगवण : दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार श्रीनाथ चौक, भिगवण येथे घडला. याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील दोन अल्पवयीन मुले दुचाकी वरून पिण्याच्या पाण्याचे जार घेऊन घरी निघाले असता श्रीनाथ चौक येथे दारू पिऊन नाचणार्या युवकास गाडीचा धक्का लागला त्यावर गाडीचालकाने माफी मागितली तरीही तेथे जमलेल्या युवकांनी मुद्दाम गाडीचा धक्का दिला म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी, दांडक्याने मारहाण केली.
याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य अमितकुमार वाघ यांचेसह अक्षय भरणे, रोहित भरणे, बाळा भरणे, अमोल वाघ, अतुल गाडे, रोहित गाडे, साहिल गाडे, विजय गुणवरे, अजय गुणवरे, अंकुश गाडे, राहुल गाडे, ऋतिक चव्हाण गुणवरे, सनी जाधव, विशाल खंडेराव गाडे, भावेश नामदेव धवडे व इतर अनोळखी 10 ते 12 (सर्व रा. भिगवण) यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत. दरम्यानच्या काळात भिगवण मध्ये तणाव निर्माण झाला असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.