आरटीआय कार्यकर्ते चौधरी यांचा जोगेंद्र कट्यारेंवर गंभीर आरोप
राजगुरूनगर – खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी मलाही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करून धमकी दिली होती, असे खळबळजनक व्यक्तव्य माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी शुक्रवारी (दि. 31) प्रांताधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांना ही माहिती दिली.
बाळासाहेब चौधरी म्हणाले की, खेड न्यायालयातील 500 वकिलांनी प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. कट्यारे हे सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार यांना अरेरावी करीत होते. खेड तालुक्यातील रिंग रोड आणि महसूल प्रकरणातील काही संशयात्मक निकालाबाबत माहिती अधिकारात पत्र दिली. त्यावर कट्यारे यांनी पुन्हा असे पत्र दिल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करेन.
आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून गुन्हा दाखल करून कायमचा बंदोबस्त करेन, असा सरळ दम दिला होता. आत्महत्या शब्दप्रयोग वापरला म्हणून घाबरून कोणतीही वाच्यता, तक्रार न करता मी प्रांताधिकारी कट्यारे यांच्याकडे जाणे टाळले. मात्र हा अधिकारी अतिशय भ्रष्ट असून ब्लॅकमेल करणारा आहे. त्यातुन तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता इतरांवर ते आरोप करीत आहेत.
माझ्याकडील पुराव्यांसह मी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत आहे. माझ्याबरोबर तालुक्यातील पीडित शेतकरी सुद्धा आहेत, रविवारी (दि. 2) पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणार आहोत, असे बाळासाहेब चौधरी यांनी म्हटले आहे.
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आपण काही पत्र दिली. मात्र ती थेट निकाली काढून प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी माहिती देणे टाळले.
– संजय जाधव, संजय जाधव, माजी सरपंच, वांद्रे