डॉ. शशिकांत तरंगे ; पळसदेव येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभा
पळसदेव – काम केलेल्या माणसाला प्रोत्साहन दिले पाहिजे, केलेल्या कामाची विरोधकांनी कौतुक केले पाहिजे. त्यामुळेच पुन्हा आणखी जास्त काम करण्यास ऊर्जा मिळते; परंतु इंदापूर तालुक्यात तसे घडत नाही. चांगले काम करणार्या भरणे मामांना, विधानसभेत मदत करण्यासाठी, विरोधी पक्षातील देखील कार्यकर्ते, युवक नेते खुलेपणाने प्रवेश करीत आहेत. साथ देत आहेत. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा एकदा इंदापूरकर साथ देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे सोमवारी (दि. 11) इंदापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे बोलत होते. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,संजय सोनवणे, हनुमंत बनसोडे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, मेघराज कुचेकर, दीपक जाधव, अतुल व्यवहारे, नानासाहेब नरुटे, संदेश देवकर, वसंतराव आरडे, सूरज काळे, यांच्यासह परिसरातील मतदारउपस्थित होते.
तुम्ही सातत्याने सांगता, या तालुक्याला शंकरराव भाऊंचा वारसा आहे. इंदापूर तालुक्यात सामाजिक समतोल राखण्याचे काम भाऊंनी केले. भाऊंनी जन्म घेतल्यापासून काँग्रेसचा विचार सोडला नव्हता. पूर्ण हयात त्यांनी काँग्रेसमध्ये घालवली. कधीही विचार बदललं नाही, पक्ष बदलला नाही. ही तत्व विरोधी उमेदवारांनी पाळली नाहीत. तत्त्वनिष्ठ माणसाचा आपल्यासाठी वापर केला गेला अशी टीका, प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे यांनी केली. युवक नेते दीपक जाधव म्हणाले, पळसदेव गावचे विकासासाठी 63 कोटी इतका निधी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आला.
सावध रहा आपल्यामध्ये वाद लावतील
पळसदेव गाव हे अतिशय चांगले आहे. सर्व गावकरी आपल्या विचारांचे आहेत. या गावासाठी खूप काम केले आहे. मात्र आपापसात तुझं कसं, ह्याचं कसं होणार असे म्हणून विरोधक उगीच पळसदेवमध्ये वाद लावतील. त्यामुळे सावध राहा, मी कधीही गटातटाचा विचार करत नाही. सर्वांना आगामी काळात ही समान न्याय देईल, जे मला मतदान होईल त्याचे श्रेय संपूर्ण गावाला असेल, असे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले.