डॉ. राम गावडे : भोसेत आमदार मोहितेंच्या प्रचारार्थ गाव भेट दौरा
शेलपिंपळगाव – खेड आळंदी-विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मजबूत आहे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याने तालुक्यातील वातावरण बदलले आहे. महायुतीची ताकद दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. राम गावडे यांनी केले.
भोसे (ता. खेड) येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेच्या निमत्ताने गाव भेट दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गुजरात राज्याचे माजी गृह राज्यमंत्री विजय जडेजा, निवडणूक प्रभारी महेश मोदी, भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील, भाजप प्रदेश सदस्य डॉ. राम गावडे, कैलास सांडभोर, शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे, धनंजय पठारे,
शांताराम चव्हाण, गणेश सांडभोर, संजय रौंधळ, हनुमंत कड, रणजित गाडे, गणेश बोत्रे, विशाल पोतले, सरपंच विजय काळे, अध्यक्ष बबन गांडेकर, तानाजी कुटे, बाप्पू कुटे, दिगंबर लोणारी, भरत गांडेकर, अण्णासाहेब लोणारी, मीनाक्षी लोणारी, माऊली मुंगसे, वसंत लोणारी, संजय चव्हाण, कृष्णा लोणारी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटलांची भावनिक साथ
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ या तालुक्याला अनेक वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पण खेड तालुक्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. स्व. नारायण पवार हे देखील 4 वेळा आमदार होते त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. दिलीप मोहिते पाटील यांना निवडूना द्या, मी त्यांना मंत्री करतो, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असल्याने मोहितेंच्या रूपाने चालून आलेल्या मंत्रिपदाच्या संधीचे सोन तालुक्यातील जनतेने करावे अशी भावनिक साद तालुक्यातील जनतेला भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी घातली.