नायगाव – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे आलेल्या भरकटलेल्या हरणाला शेतक-यांनी राखलेल्या प्रसंगावधनाने या भरकटलेल्या हरणाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
शेतकरी रवींद्र उत्तम ठवाळ त्यांच्या शेतात जात असताना शेताजवळ हरीण आढळले. त्यांनी नायगाव सोसायटीचे संचालक चंद्रकांत चौंडकर यांना फोन वरून संपर्क साधला. चंद्रकांत चौंडकर यांनी वनखात्याचे कर्मचारी काळूराम शेंडगे यांच्याशी संपर्क करून त्यांना हरीण असलेल्या ठिकाणी बोलविले. तो पर्यंत शेतकरी रवींद्र ठवाळ व त्यांचे वडील उत्तम ठवाळ, भाऊ गणेश ठवाळ त्या हरणाची देखरेख करीत होते. हे हरीण वन खात्याचे कर्मचारी काळुराम शेंडगे, सूर्यकांत कुंजीर, शिवरत्न जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी ते म्हणाले वन्यजीव हाताळणे,प्रदर्शन करणे,त्यांना दुखापत करणे कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वन्यजीव बाळगल्यास कडक कारवाईची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच बारीकराव खेसे, माजी सरपंच बाळासाहेब कड,ग्रामपंचायत माजी सदस्य उत्तम ठवाळ, संचालक चंद्रकांत चौंडकर, सामाजिक कार्यकर्ते अजय खेसे, रवींद्र ठवाळ, गणेश ठवाळ, रोहित बोरकर आदी उपस्थित होते.