वाल्हे (पुणे) :- पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे- मिरज लोहमार्गावरील वाल्हे- नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील रेल्वे फाटक (क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वे फाटक) शुक्रवार (दि.८ जुलै) सकाळी ८ ते रविवार (दि. १० जुलै) सकाळी ८ पर्यंत म्हणजेच दोन दिवस (४८ तास) वाहतुकीस बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर या पालखी महामार्गावर थोपटेवाडी हद्दीत रेल्वेचे २७ नंबरचे फाटक आहे. हे फाकट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी शुक्रवार (सकाळी ८) ते रविवार (सकाळी ८ वाजेपर्यंत) बंद राहणार आहे.
या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी निरा- मोरगाव- जेजुरी या मार्गाचा वापर करावा. असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.