बारामती : बारामती जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव शासनापुढे नाही. मी महसूलमंत्री म्हणून काम केल आहे, त्यामुळे अशा प्रकारची कोणतेही चर्चा नाही. या सर्व बातम्या कपोलकल्पित आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे कामानिमित्त जात असताना बारामती विमानतळावर पत्रकारांशी विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. राज्यातील पालकमंत्रिपदाच्या नाराजी नाट्यावर विखे पाटील म्हणाले की, मला वाटतं नाही, यात नाराज असण्याचे कारण नाही प्रत्येक नेत्याला वाटतं की हा जिल्हा मला मिळावा, महायुतीत अशी अनेक प्रसंग येत राहतात,कारण आमचा प्रपंचा आहे.
एवढा मोठा महाजनादेश महायुतीला मिळालेला आहे, त्यामुळे साहजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. तिन्ही नेते मिळून एकत्रित मार्ग काढतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत शिंदे सातत्याने आपल्या दरे या गावी जात असतात, ते काही पहिल्यांदाच तिकडे गेले आहेत का? असे त्यांनी नमूद केले.
1 रुपया पीक विमा बंद होण्याच्या वावड्याच
शेतकर्यांसाठी असलेला 1 रुपया पीक विमा बंद होण्याबाबत कोण वावड्या उठवत आहे. हे मला कळत नाही. एवढे मोठे बजेट येत आहे. 1 रुपया पीक विमाच्या सकारात्मक परिणाम शेतकर्यांवर होत आहे, त्यामुळे या विमा बद्दल शेतकर्यांमध्ये उत्सुकता आहे. पूर्वी विमा कंपनीची जी घरे भरली जात होती, आता उलटी परिस्थिती आहे, शेतकर्यांना एवढी मोठी मदत झाली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सष्ट केले.
पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाही – शेलार
पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपसात संवाद साधत आहेत. यावर कोणतेही नाराजी नाट्य नाही. तसेच बीड आणि परभणी घटनेवर ज्यांना राजकारण करायचा आहे ते करतील,आरोपी पकडले आहेत, एसआयटी काम करीत आहे. संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.दोन्ही घटनेत न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. दोन्ही परिवारांच्या दुःखाचं राजकारण कोणीही करू नये, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.