वाल्हे : जय ज्योती.. जय क्रांती.., महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, या घोषणांनी वाल्हे (ता. पुरंदर) परिसर दुमदुमला होता.
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करावा,या शिफारशीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला.
हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल वाल्हे (ता.पुरंदर) येथील क्रांतीसूर्य समता विकास प्रतिष्ठान व ग्रामस्थांमधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वाल्हे गावच्या उपसरपंच साम्राज्ञी लंबाते, ग्रामपंचायत सदस्या मयुरी भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले स्मारकास पुष्पहार अर्पण करून, पेढे, लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भुजबळ, अतुल गायकवाड, महादेव चव्हाण, सूर्यकांत भुजबळ, सत्यवान सूर्यवंशी, भालचंद्र भुजबळ, तुषार भुजबळ, दादासाहेब राऊत, अनिल भुजबळ, सतीश भुजबळ, सागर भुजबळ, दादासाहेब मदने, सुजित राऊत, अनिल दुर्गाडे, हनुमंत भुजबळ, संतोष दुर्गाडे, नितीन बुनगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.