शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील सोनार आळी येथील प्रतिक्षा वैभव शहाणे (२०) ही मुलगी मैञीणीकडे जावुन येते असे सांगुन घरातुन निघुन गेली असुन परत घरी आली नाही. तीचा शिरुर परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असुन ती मिळुन आली नाही.
सदरची मुलगी दि. २३ जून रोजी ०१ वा सोनार आळी येथील राहत्या घरातुन मैत्रिणीकडे जावून येते असे सांगून ती निघून गेली आहे. दोन दिवस ऊलटूनही मुलगी घरी न आल्याने या बाबत मुलीची आई विद्या वैभव शहाणे यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिंदे हे करत आहे.
मिसींग व्यक्तीचे नाव व वर्णन –
कुमारी प्रतिक्षा वैभव शहाणे (वय २० . वर्ष ) रा.सोनार आळी, शिरुर ता.शिरुर जि.पुणे ,रंग -गोरा ,उंची ५ फुट ,अंगाने सडपातळ ,केस- लांब सरळ ,मानेवर फुलपाखरासारखे गोंदलेले, निळे रंगाची जिन्स पँन्ट, अंगात चाँकलेटी रंगाचा शर्ट व त्यावर श्रग ,पायात काळे रंगाचे सॅन्डल अशा वर्णनाची मुलगी कोठे आढल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केले आहे.