अकलूज – शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-2025 चा 63 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते झाला.
कारखान्याने गळीत हंगाम 2024-2025 मध्ये 9 लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. सर्व मशिनरी गाळपासाठी सज्ज असून प्रतिदिवशी 8,500 मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, संचालक सतीशराव शेंडगे-पाटील, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, माजी संचालक सुरेश मेहेर, बाळासाहेब पवार (तरसे), तसेच सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.