बारामतीत तरूणाईत उत्साह संचारला
डिजिटल पासेससाठी वाढती मागणी
बारामती – प्रभात व निसर्ग कट्टा बारामती यांच्या वतीने रविवारी (दि.2) रोजी होत असलेल्या पंचतारांकित दांडियासाठी बारामतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तरुणाईमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे यंदा दांडिया उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. शहरात तरूणाई, महिलांकडून डिजिटल पासेससाठी वाढती मागणी आहे.
मागील दोन वर्षांत करोनामुळे पंचतारांकित दांडिया महोत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाच्या दांडिया महोत्सवासाठी तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. करोनाचे मळभ हटल्यानंतर आता प्रभात आणि निसर्ग कट्टा यांच्या वतीने शहरवासियांसाठी नवरात्रीनिमित्त कलारंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रभातचा हा सोहळा दांडियाचा उत्साह व्दिगुणीत करणार आहे.
शहरातील भिगवण रोडवरील जयश्री गार्डन येथे रविवार (दि.2) ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत हा उत्सव होणार आहे.
प्रभात व आर. जे फिल्मसच्या माध्यमातून पंचतारांकित दांडियाचे हे तिसरे वर्ष आहे. आतापर्यंत दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदा देखील बारामतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले असून डिजिटल पासेससाठी महिला, तरूणी व नागरिकांकडून मागणी वाढली आहे.
ऑनलाइन पास मिळविण्यासाठी डिजिटल प्रभात व निसर्ग कट्टा यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करावे. संपर्कासाठी प्रभात प्रमोद ठोंबरे (9552512912) आर जे सायकल स्टुडिओ राहुल ढाकाळकर (9834981718) दैनिक प्रभात संपर्क कार्यालय चैतन्य एजन्सी श्रीराम उद्योग भवन भिगवण रोड व आर. जे. सायकल स्टुडिओ येथे संपर्क साधावा.
मुख्य आकर्षण
भाऊराव कऱ्हाडे व टीम ख्वाडा राष्ट्रपती पदक विजेता बबन व नवीन चित्रपट टी डी एम व हैदराबाद कस्टडीचे कलाकार येत आहेत. झी मराठी मन झाले बाजींद व देव माणूस फेम सुवर्णा चोथे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
प्रायोजक
चव्हाण बिल्डर्स, आनंद एंटरप्राइजेस, खत्री खाटमोडे असोसिएट्स, आदित्य ग्रुप बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, जे. बी. एस सराफ,मेहता हॉस्पिटल, क्वाटीन्ट, बारामती सायकल क्लब, काटे मोटर्स, जाचक टायर्स, मुक्ताई टेक्सटाईल, बारामती ट्रेकर्स क्लब, दुर्ग भ्रमंती, वैष्णवी ग्राफिक्स, स्वराज फर्निचर, रॉयल किचन हाऊस, शिव क्रिएटिव्ह, एन. बी. कंट्रक्शन, श्री. कन्स्ट्रक्शन.