राजगुरूनगर -खेड तालुक्यात आज नव्याने तब्ब्ल 36 रुग्ण सापडले आहेत. चाकण आणि आळंदी नगर परिषद हद्दीत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 10882 रुग्ण संख्या झाली असून 10532 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 206 जण उपचारादरम्यान दगावले आहेत.
144 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 24 तासात 36 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. 24 तासात आळंदीत तब्बल 13 रुग्ण, चाकण 8, राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत 1 आणि चाकण परिसरातील गावांमध्ये 14 जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.