भोर – पुढील पाच वर्षांत तालुक्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवण्याचे माझे वचन आहे. मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खात्री मी देतो. स्थानिक युवकांना रोजगारनिर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी दिली.
महायुतीतील भोर, राजगड, मंळशी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर आज भोर तालुक्यातील गावभेट दौर्यावर होेत. या दौर्यात त्यांच्यासोबत माजी आमदार शरद ढमाले, माजी उपसभापती रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दशरथ जाधव, आणि आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड यांसारखे मान्यवर सहभागी झाले होते. आंबेघर,
चिखलावडे, नाटंबी, कारंजे, कारंजेवाडी, पानव्हळ, नाझरे, कर्णावड, रावडी, चिखलगाव, टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हाकोशी, आंबवडे, घोरपडेवाडी, सांघवी, कारी, अंगसुळे, भावेखल, आपटी, नांदगाव, वाठार हिमा, पिसावरे या गावांना मांडेकर यांनी भेट दिली. या दौर्यात त्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला.
गाव भेटी दरम्यान मांडेकर म्हणाले, मी उमेदवार नसून सर्वसामान्य जनता उमेदवार आहे हेच लक्षात ठेवून मतदान करा, अशी भावनिक साद महायुतीचे भोर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी गाव भेटी दरम्यान मतदारांना घातली.