चिंबळी : उन्हाचा कडाका मार्चपासूनच जाणवू लागला असून, आगामी उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी गारवा देणार्या उसाच्या रसाला पुणे-नाशिक महामार्गावर मोठी मागणी वाढली आहे. तसेच रसदार कलिंगड, खरबूज फळांचेही स्टॉल लागले असून ती खरेदी करण्यासाठीही ग्राहकांचा ओढा कायम आहे.
उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी नागरिक उसाच्या रसाला प्राधान्य देत आहेत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्राहकांची रसवंतीगृहांवर मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. ’उसाचा ताजा रस प्यायल्याने सगळा थकवा दूर होतो.
उन्हाळ्यात अनेकजण कोल्ड्रिंक्स आणि सोड्याचे सेवन करतात, त्यापेक्षा कमी किमतीत आणि अधिक आरोग्यदायी पर्याय म्हणून उसाच्या रसाला नागरिक पसंती देत आहेत, असे पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी, चिंबळी, केळगाव येथील रसवंती चालकांनी सांगितले.
उसाच्या रसाच्या स्टॉल्सवर 20 रुपये प्रति ग्लास उसाचा रस मिळत असून, कलिंगड 25 रुपये किलो विकले जात आहेत. दरम्यान, शितपेयांपेक्षा उसाचा रस आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.