पौड : मुळशीत भरपूर प्रमाणात पाऊस असल्याने दरवर्षी पर्यटक पळसे धबधबा, मुळशी धारण, ताम्हाणी घाट परिसरात गर्दी करत असतात यावर्षी पावसाची सुरवात होताच पर्यटकांनी मुळशी भागात गर्दी करीत आहे.
काही दिवसा पुरवी झालेला प्लस व्हॅली मधील वाहून गेलेला तरुण तसेच लोणावळा येथे कुटुंब वाहून गेले एवढे होऊनही पर्यटक मुळशी भागात धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी व जाण्यासाठी बंद घालण्यात आलेले आहे तरी सुद्धा पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत
वाढत्या पर्यटकांचा गर्दी मुळे सायंकाळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती कोलाड पुणे महामार्गावर गोणवाडी दरम्यान रस्त्याला खड्डे च खड्डे पडले असल्यामुळे वाहतूक कोंडी मो प्रमाणात झाली याठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस ईश्वर काळे , सिद्धेश पाटील ,पोलीस मित्र निखिल आमराळे यांनी धोकादायक असे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याची वेळ आली तर पौड या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुळशी धरण भागात पोलीस सचिन शिंदे तर पौड चौकात पोलीस सचिन सलगर यांना कसरत करावी लागली.
कोलाड महामार्गावर गोणवडी दरम्याम पडलेल्या खड्डयामुळे स्थानिक नागरीक,पर्यटक,पोलिस , यांना त्रास सहन करावा लागत आहे तर अपघाताचे प्रमाण वाढत आहेत