– राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
विंझर – मालवण येथे दुर्घटनाग्रय्त झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूतळा सन्मानपूर्वक पुन्हा त्यांच ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने वेल्हे तालुका तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले. याप्रसंगी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही.
म्हणून सर्व महाराष्ट्र राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना वेल्हे (राजगड) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे शक्तिशाली स्मारक पुन्हा उभारण्यात यावे, अशी देखील मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी पी डी सी सी बँक संचालक रेवणनाथ (आण्णा) दारवटकर,
पुणे जिल्हा कात्रज सहकारी दूध डेअरी संचालक भगवान (बाप्पू) पासलकर, वेल्हे तालुका राष्ट्रवादी ग्रेस अजित पवार गट अध्यक्ष किरण राऊत, पीडीसीसी बँक संचालिका निर्मला जागडे, राजगड सहकारी साखर कारखाना माजी व्हाईस चेअरमन, युवक अध्यक्ष संदीप खुटवड, महिला अध्यक्षा कीर्ति देशमुख इ प्रमुख पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.