जेजुरी : जेजुरीमधील 1992 सालापासून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासने पोलीस बंदोबस्तामध्ये हटवल्यामुळे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जेजुरी मध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
याप्रसंगी पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष पंकज धिवार जेजुरीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष भालेराव भगवान डिखळे पंढरीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पुतळा जोपर्यंत प्रशासन नवीन ठिकाणी जागा देत नाही बसवून देत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील ,
अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत त्यांनी संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी पुणे पंढरपूर महामार्ग बंद पडलेला आहे. एक तासाभरापासून संपूर्ण हायवे बंद असल्यामुळे दोन्ही बाजूला पाच पाच किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच नंबर रंग लागलेले आहेत