नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला बचत गट महोत्सवाला नीरा आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या महिला बचत गट महोत्सवामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते. केवळ पहिल्या दोन तासांमध्येच या स्टॉलमधील 75 टक्के पदार्थांची विक्री झाली.
महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून 53 स्टॉल यावेळी लावण्यात आले होते. यामध्ये नीरा आणि परिसरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून बनवलेले वेगवेगळे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. नीरा आणि परिसरातील लोकांनी याला चांगला प्रतिसाद देत महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची खरेदी केली. केवळ चार तासांच्या या महोत्सवात लोकांनी लाखो रुपयांच्या वस्तूंची आणि खाद्यपदार्थांची खरेदी केली.
या महिला मेळाव्याचे उद्घाटन नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, ज्युबिलंट इंग्रेव्हियाचे उपाध्यक्ष सतीश भट व ज्युबिलंट फाउंडेशनच्या संचालिका देविना कमल यांनी केले. यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, निंबुतच्या सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे, ज्युबिलंट कामगार संघटनेचे अध्यक्ष सतीश काकडे, उपाध्यक्ष सुरेश कोरडे, भारती विद्यापीठाच्या संचालिका अनिता मोहिते, जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर, योगेश कोपरकर, मधुकर घोगरे, राजेंद्र राघव, किरण ठाकूर, सोनामथ भोसले, सचिन जाधव, मुकेश सिंग, संजय सोनवणे, प्रमोद दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, भारतीय विद्यापीठाच्या संचालिका अनिता मोहिते, ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या संचालिका देवीना कमल, कामगार संघटनेचे अध्यक्ष सतीश ककडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा महोत्सव पारपडण्यासाठी ग्रमपंचायात सदस्य राधा माने, संगीता जगताप, सविता दुर्वे, निकिता महामुनी आणि बचत गटांच्या महिलांनी सहकार्य केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय ढगे यांनी सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी तर सायली फुंडे यांनी आभार मानले.
नीरा (ता. पुरंदर) : महिला बचत गट महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.