ओतूर – येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात ग्रामीण भागातील पहिल्या खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेचे नुकतेच उद्घाटन झाले. चैतन्य विद्यालयात उत्तर पुणे जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयात आणि विशेषता ग्रामीण भागात पहिली खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापित झाली आहे. विद्यार्थ्यांना या अद्ययावत प्रयोगशाळेतून आता अवकाशाची सफर होईल.
अवकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, राशी, ग्रह, इत्यादींची सफर घडून आणण्यासाठी या लायन्स क्लबने या प्रयोगशाळेचा संकल्प केला होता. अवकाशीय घटनांची विद्यार्थ्यांना उकल होण्यासाठी विविध प्रकारची 8 खगोलीय उपकरणे व अवकाश निरीक्षणासाठी हाय टेक्नॉलॉजीची खगोलीय दुर्बीण प्रयोगशाळेत बसवण्यात आली. मुलांना मार्गदर्शन करता यावे, यासाठी अद्ययावत दूरदर्शनसंच लावण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ ओतूर सेलिब्रेशनचे अध्यक्ष विवेक जे. पानसरे हे होते. द्वितीय उपप्रांतपाल परमानंद शर्मा, प्रकाश मुटके, डॉ. सीमा पानसरे शिंदे, डॉ. रमेश जाधव, दिलीप परदेशी, संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, संतोष डुंबरे, वैभव डुंबरे, नितीन डुंबरे, दत्तात्रेय डुंबरे, उद्योजक रमेश डुंबरे, प्रिया पानसरे, वैशाली गाढवे-नायकोडी, संतोष बोडके, सुशीला डुंबरे, वैशाली हुले, पराग पानसरे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष जे एम पानसरे, निर्मला पानसरे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, अंजनी डुंबरे, प्रतीक अकोलकर, अथर्व पानसरे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. देवचंद नेहे, विशाल चौधरी, अमित झरेकर, प्रमोद जाधव यांनी विशेष सहकार्य केले. निर्मला व जयसिंग पानसरे खगोलशास्त्र प्रयोगशाळा असे प्रयोगशाळेला नाव देण्यात आले.
अवकाशातील अनेक गोष्टींचा होणार उलगडा
प्रयोग शाळेमध्ये खगोलशास्त्र संदर्भात विविध प्रकारची निऑनची भित्तीचित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांची अवकाशा बरोबर मैत्री घडून आणण्यासाठी, तसेच विद्यार्थांना या विषयाची गोडी लागून त्यांच्यातून नवोन्मित शास्त्रज्ञ वृत्ती वृद्धिंगत होण्यासाठी या उपक्रमाचे प्रयोजन आहे. अवकाशात अनेक अशा काही गोष्टी आहेत, रहस्य आहेत. त्यांचा उलगडा होण्यासाठी या प्रयोगशाळेचा आता उपयोग होणार आहे.