मंचर : नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यास बदलत्या युगा नुसार पत्रकारिता करू शकणारे अनेक पत्रकार टिकतील.परंतु बदलत्या युगानुसार बदल स्वीकारला नाही तर अनेक पत्रकार स्पर्धेच्या युगात बाद होतील,असा इशारा पुणे म्हाडाचे अध्यक्ष/माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.
आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत उपस्थित पत्रकार बांधवांना दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष/माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अँड.स्वप्नील ढमढेरे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.ताराचंद कराळे,भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त शरद पाबळे, जेष्ठ पत्रकार डी.के.वळसे पाटील,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, उपाध्यक्ष निलेश कान्नव,सचिव चंद्रकांत घोडेकर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे अध्यक्ष सचिन तोडकर,कामगार नेते अँड.बाळासाहेब बाणखेले, यांच्यासह खेड,आंबेगाव,जुन्नर, शिरूर,पारनेर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, पूर्वीच्या काळी फक्त वर्तमानपत्रातून बातम्या कळायच्या. प्रत्येक वर्तमानपत्रात सुंदर अग्रलेख वाचायला मिळायचे.
त्यातून आजूबाजूची परिस्थिती लक्षात यायची आजही अनेक दैनिकात चांगले अग्रलेख प्रसिद्ध होतात. मात्र आताची तरुण पिढी ही वाचनापासून दूर गेली आहे.भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील म्हणाले, समाज व्यवस्थेत पत्रकार राज्यकर्ते ही रथाला असलेली महत्त्वाची दोन चाके असून पत्रकारांनी एखादी बाजू मांडत असताना त्याची दुसरी बाजू देखील समजून घेणे गरजेचे आहे. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल ढमढेरे, उद्योजक रमेशभाऊ येवले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पत्रकार सम्राट फडणीस यांनी मागर्दर्शन केले.यावेळी रमेशशेठ येवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश येवले, मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रत्ना विकास गाडे यांना समाजरत्न पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.इलेक्ट्रॉनिक मिडियाचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी प्रास्ताविक व निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. तालुका पत्रकार संघाचे संस्थापक डी.के.वळसे पाटील यांनी आभार मानले.