सासवड : देशाच्या पटलावरती सासवड नगरपरिषदेचे नाव हे कोरलेले असताना नगरपरिषदेकडे अनेक उद्याने आहेत; परंतु ही उद्याने गेल्या अनेक वर्षांपासन बंद असून ही उद्याने सुरू करण्याची मागणी पालक व बालक यांच्याकडून केली जात आहे लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याने सुस्थितीत करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सासवड नगरपरिषदेमध्य सध्या कोणीही सत्ताधारी नाही तर प्रशासक व्यवस्था नेमलेली असून देखील सासवड शहरातील अनेक उद्याने हे ओसाड पडली असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहेत, यामुळे लहान मुलांच्या खेळण्यावर व बागडण्यावर अनेक निर्बंध येत असल्याचे सध्या सासवड शहरात पहावयास मिळत आहे.
आई-बाबा आम्हाला खेळायला जाऊ द्या, अशी मागणी लहान मुले करत असली तरी सध्या सासवड शहरातील अनेक उद्याने ही कोविड काळापासून बंद आहेत तर काही उद्यानांमध्ये स्वच्छता नसल्यामुळे सरपटणार्या प्राण्यांच्या सोबतच इतर दंश करणार्या प्राण्यांमुळे या उद्यानाकडे कोणीही जात नसून सध्या ही उद्याने मद्यपींच अड्डा बनत असल्याचे पहावयास मिळत आहे.
सासवड शहरामध्ये सर्वात मोठे जिजामाता उद्यान असून हे उद्यान देखील करोना काळापासून बंद असल्याचे पाहावयास मिळते तर शहरातील हाडकोच्या भागांमध्ये असणारी अनेक उद्याने ही बंद असून त्यामध्ये गवत उगवल्याचे पाहावयास मिळते. यासंदर्भात सासवड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आमच्या कार्यकाळामध्ये उद्यान संवर्धनासाठी प्रयत्न केले होते; परंतु आता प्रशासक असल्यामुळे याबाबत मुख्याधिकारी जास्त सांगू शकतात.
मार्तंड भोंडे, माजी नगराध्यक्षआता सध्या दोन उद्याने सुरू असून इतर सर्व उद्याने उन्हाळ्यामध्ये सुरू करणारा असून उन्हाळ्यामध्ये नागरिकांची वर्दळ असते.
मोहन चव्हाण, आरोग्य विभाग सासवड नगरपरिषद