मंचर : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मंचर (ता. आंबेगाव) येथे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शनिवारी (दि. 24) मूक आंदोलन केले.
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले , उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, आंबेगाव तालुका पंचायत समिती माजी सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सुरेखा निघोट,
राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष पूजा वळसे पाटील, भरत मोरे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश यादव, लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे, सुरेश निघोट, शहर प्रमुख विकास जाधव, विशाल वाबळे, कैलास वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष कुणाल बाणखेले, स्वप्निल बांगर, महेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते .