पुणे जिल्हा : श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेच्या शिरपेचात मानाचा तुरा

शिरूर : बापूसाहेब गावडे विद्यालय ,टाकळी हाजी या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातील श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे येथील मुलींनी प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
पुणे जिल्ह्यामध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रथम तालुकास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात व त्यातील विजयी संघांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. शिरूर तालुक्यामध्ये झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने बाजी मारून प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल सविंदणे गावच्या सरपंच शुभांगी पडवळ, विद्यालयाच्या प्राचार्य शारदा मिसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लंघे,
जूनियर कॉलेज व्यवस्थापन समितीचे सचिव बाळासाहेब पडवळ यांनी विजयी संघाचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नामदेव कंठाळी, स्वाती तांबे, प्रमोद भोईर, गणेश शेळके व चव्हाण सर यांचे अभिनंदन केले.
संघातील खेळाडूंची नावे : संघाची कॅप्टन पूर्वा कोळेकर, परिघा लंघे, दिशा भोर, दीक्षा किठे, सिद्धी मुंजाळ, अंजली लंघे, तनिष्का मुंजाळ, कोळेकर वेदांती, पडवळ तन्वी, भोर माधुरी यांनी चांगली कामगिरी करून विद्यालयास विजय मिळवून दिला.





