आंबेठण : चाकण औद्योगिक वसाहतीचे पाच टप्पे झाले; मात्र यात सुरक्षेसोबतच पायाभूत सुविधांचाही वानवा असल्याने येथे कंपनी मालक, कामगार, स्थानिक नागरिक कायमच भीतीखाली वावरत असून खून, दररोडे, गोळीबार, विनयंभग, अपहरण या घटनाच्या नित्याचाच झाल्या असल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीअ काही गुन्हेगार खंडणी, हप्ते गोळा करण्याचे प्रकार करतात. त्यांना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असतो. काही गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतात तर काही अजिबात होत नाही. त्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप असे प्रकार याऔद्योगिक वसाहतीत घडतात. गैरप्रकारांना काही कंपनी मालक, कंपनी व्यवस्थापन कंटाळले आहेत. त्यातच वरळे येथील एक स्टील कंपनीत शिरूर दोन हल्लेखोरांनी व्यवस्थापकावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली असून औद्योगिक वसाहतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
चाकण औद्योगिकवसाहत मोठी आहे. या औद्योगिक वसाहतीतून सरकारला कर रूपाने मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. परंतु येथेअजिबात पायाभूत सुविधांसह सुरेक्षेबाबर बोंबच असल्याचे चित्र आहे. पायाभूत सुविधांमध्ये अंतर्गत रस्ते, मुख्यमार्गांची कामे काहीच नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीसातत्याने होते. औद्योगिक वसाहतीत पायाभुत सुविधा करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. औद्योगिक वसाहतीत काही मंत्र्यांच्या नातेवाइकांचा मोठा हस्तक्षेप राहतो. औद्योगिक वसाहतीतील समस्यासोडविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही.
वाहने पार्किंग करण्यासाठी स्वतंत्र मोठ्या जागा नाहीत. ही वाहने मार्गांवरकोठेही लावली जातात. औद्योगिक वसाहतीत मोठ्या समस्या आहेत. वसाहतीत दुर्गधीयुक्त कचरा अगदी रस्त्याच्या कडेला ढीग लागून तसाचसाचून राहतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर कंपनीतील कामगार, व्यवस्थापकांवर सर्रास हल्ले होत असतानाही केवळ थातूरमातूर कारवाई होत असल्याने कामगार, मालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गुन्हेगारी, ठेकेदारी विळखा ….
औद्योगिक वसाहतीत कंपन्यातील विविध कामांचे ठेके, अगदी कंपन्यातील भंगार मिळविण्यासाठी काही सराईत गुन्हेगार, काही स्थानिक पुढारी, काही पोलीस अधिकारी, नेते सातत्याने प्रयत्न करतात. त्यातून वादावादी व इतर प्रकार ही घडतात. कंपन्यातील कंपनी प्रतिनिधी काही व्यवस्थापन कर्मचारी यांचाही ठेकेदारी मिळविणार्या लोकांना पाठिंबा असतो त्यात भागीदारी असते हे वास्तव असून या सर्व प्रकारांना कामगारांसह कंपनी मालक वैतागले आहेत.