हरगुडेतील प्रकार : उपसरपंचांच्या समतीने सभा पुढे ढकलली
परिंचे – हरगुडे (ता. पुरंदर) येथे ग्रामसेवकांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामसेवक नितीन खोमणे व सरपंच भूषण ताकवले गैरसमज राहिले असून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिलांनी ग्रामसेवक व सरपंचांची खुप वेळ वाट पाहून घरचा रस्ता धरावा लागला. माजी सरपंच मोहन ताकवले यांनी सांगून निष्काळजी ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामसेवक नितीन खोमणे यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.ही ग्रामसभा उपसरपंच अविनाश जाधव यांनी ग्रामस्थांच्या सम्मतीने पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
हरगुडे गावचे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असल्याने त्यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. 29) सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ग्रामसभेला ग्रामस्थ व महिलांनी उपस्थित रहावे म्हणून गावात सोशल मीडियाद्वारे देऊन फलक लेखन व ग्रामपंचायत सदस्यांना पत्र काढण्यात आले होते. सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व ग्रामस्थ उपस्थित झाले तब्बल अकरा वाजेपर्यंत या सर्वांनी ग्रामसेवक व सरपंचाची वाट पाहिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील यादव, मंगल ताकवले, कमल ताकवले हे चार सदस्यांसह मनोज ताकवले, जयवंत ताकवले, संजय ताकवले, भुपेंद्र ताकवले, कल्याण ताकवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गावात सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरू असून गेल्या महिन्यातील मासिक सभेलाही हे दोघे गैरहजर असल्याचे उपसरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.
सर्व ग्रामसभा वेळेवर झाल्या असून शंभर टक्के ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ग्रामसभा झाल्या आहेत. आजारी असल्यामुळे आजच्या ग्रामसभेला मला उपस्थित रहाता आले नाही मागील दोन वर्षात गावात अनेक विकास कामे झाली असून राजकीय द्वेषापोटी माझ्याविरुद्ध आरोप केले जात आहेत.
-भुषण ताकवले, सरपंच, हरगुडे
पंचायत समितीकडे केली तक्रार
सहा महिन्यांपूर्वी ग्रामसेवक व सरपंचांनी मागील आर्थिक वर्षातील महत्त्वाच्या ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली असल्याने या बाबतची तक्रार पंचायत समिती, पुरंदर यांच्याकडे केली असून याबाबत कोणतीही अद्याप झाली नसल्याचे हंसराज ताकवले यांनी सांगितले.