शिरूर : शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या बदली झाल्याने शिरूरच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे.
गुंजवटे यांच्या कार्यकाळात शिरूर शहरासह पोलिस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी, शेतकर्यांचे कृषी पंप , विद्युत रोहीत्र,केबल चोरी , टुव्हीलर फोर व्हीलर गाडयांची चोरी, अल्पवयीन मुली – महिला गायब होण्याचे प्रकार वाढले, असे अनेक गुन्हे घडले असून त्या गुन्ह्यांची अदयापही ऊकल झाली नाही.
तसेच शिरूर शहरासह ग्रामीण जुगार, मटका, गांजा विक्री, दारु विक्री, गुटखा, वेश्या व्यवसाय या अवैध्य धंदयांनी उच्छाद मांडला असून यांचा बिमोड करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढे आहे.
आता शहरासह तालुक्यात जुगार, मटका, गुटखा विक्री, अवैध दारु, गांजा विक्री तसेच गॅस रिफिलींग व्यवसाय जोमात सुरु असून त्यांना आवर घालणार घालण्यास प्रयत्न होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल..शिरूर शहरामध्ये वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून याला आवर घालणे महत्वाचे आहे. तसेच शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून शिरूरकरांना केंजळेसाहेबांकडून दबंग कामगिरीची अपेक्षा आहे.