वाघोली : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी भेट घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाघोली मधील भाजपचा एक कार्यकर्ता संदीप सातव यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा आमदार विक्रांत दादा पाटील यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप नेते राजेश पांडे व इतर यांच्या सहकार्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व संदीप सातव यांची भेट पुणे येथे झाली.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देशाचा पंतप्रधान भेटू शकतो हा आत्मविश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट एका कार्यकर्त्याला ऊर्जा देणारी असल्याचे वाघोली चे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान आमदार, खासदार यांना प्रोटोकॉल साठी भेटू शकतात मात्र एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही तोच न्याय मिळू शकतो. यामुळे सोशल मीडियात सध्या संदीप सातव यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.