इंदापूर – इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच प्रभाग क्रमांक 1 सृजन नागरी संघर्ष समिती इंदापूर यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिरात एक प्रभागातील 200 नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण घेतले.
पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके यांच्यासह अंकुश बळगानोरे यांनी लसीकरण केले.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक अनिकेत वाघ, माजी नगरसेवक प्रशांत शिताप, सुधीर मखरे, महादेवराव लोखंडे, विकास खिलारे, मुकुंद साळुंके,तुकाराम कांबळे, श्रीकांत मखरे, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.