शिक्रापूर – शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ वाघोलीमध्ये भव्य पदयात्रा पार पडली. वाघोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
वाघोली येथे शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आयोजित करण्यात आलेली होती. पदयात्रेमध्ये विशेषतः महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे.
वाघोलीमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांना नक्कीच धडकी भरेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी संजय सातव, राजेंद्र सातव कमलाकर सातव, शांताराम कटके, बाळासाहेब सातव, कैलास सातव, दौलत पायगुडे, युवराज दळवी, वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, मीनाकाकी सातव, अर्चना कटके, विक्रम वाघमारे आदींचं मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आलेले आहेत. विकासकामांची पोहोच पावती म्हणूनच ही आजची गर्दी झाल्याचे बोलले जात आहे. आज मिळालेल्या प्रतिसादाने अशोक पवार यांच्या गटाची ताकद वाढली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.